मुंबई(Mumbai): विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी(Adani) यांच्या कंपनीकडे गेल्यामुळे त्याठिकाणी अदानी एअरपोर्ट्स(Adani Airports) असे नावाचे बोर्ड लावण्यात आले होते. हे सर्व बोर्ड्स आज शिवसैनिक आणि भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. अदानी उद्योग समूहाने मुंबई विमानतळाला 'अदानी एअरपोर्ट्स' असं नाव लावलं होतं. या संदर्भात अनेक तक्रारी शिवसैनिकांकडे आल्या. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी आणि भारतीय कामगार सेनेने विमानतळाला लावलेले अदानी एअरपोर्ट्सचे नाव फोडून टाकले.
#chatrapatiShivajiMaharajairports
#Mumbaiairport #Adaniairports #Shivsena