देशातील पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावरुन जोरदार चर्चेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी आपल्या कर्मचार्यांना कार्यालयीन वेळेत मोबाईल फोनचा वापर कमी करण्यास सांगितले आहे. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशात राज्य शासकीय अधिकारी आणि सरकारी कर्मचार्यांनी अधिकृत कामांसाठी आवश्यक असल्यास मोबाइल फोनचा वापर करावा असे सांगण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मोबाईल वापरांवर निर्बंध लावत राज्य सरकारने नवी नियमावली जरी केली आहे. पाहुयात काय सांगते ही नियमावली.
#maharashtra #government #mobile #socialmedia