Rain:पावसाच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी नागरिकांची धडपड |Fish | Citizens | Mumbai Rain |Sakal Media
डोंबिवली - पावसाच्या पाण्यात केवळ भिजण्याचा आनंद घेता येतो असे नाही तर डांबरी रस्त्यावर मासेमारीचाही आनंद लुटता येतो. डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांनी सोमवारी पावसाच्या पाण्यात मासेमारी करीत हा आनंद लुटला. रविवार पासून शहरात पावसाची संततधार सूरु असून नाले भरून वाहत आहेत. अनेख सखल भागात जागोजागी पाणी साचले आहे. पश्चिमेतील नवापाडा परिसरात रस्त्यावर पाणी साचले या पाण्यात चक्क मासेही वाहून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खाडी पासून हा परिसर आतमध्ये असल्याने चेंबर मधून खाडीतील मासे येथे आल्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली. असे असले तरी भर पावसात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात मासेमारीची मज्जा डोंबिवलीकरांनी लुटली.
#Rain #Fish #Dombivli #MumbaiRain #Heavyrain #RainySeason