Navi Mumbai : धबधब्यावर गेलेल्या पर्यटकांची मस्ती अंगलट आली
Navi Mumbai : अडवली-भूतवली येथील धबधब्यावर गेलेल्या पर्यटकांच्या त्यांची मस्ती अंगलट आली. धबधब्यावरून परतताना ओढ्याला वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात कार चालवून ओढा ओलांडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान स्थानिकांनी सांगून देखील न ऐकल्याने अखेर पाण्याच्या प्रवाहसोबत कार वाहून जाऊ लागली. हे पाहताच काही स्थानिकांनी धाव घेत कार मधील चालकासाहित इतरांना बाहेर काढले. तेवढ्यात कार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. या घटनेत कार चालकासाहित इतर थोडक्यात बचावले.
#waterfallaccident #NaviMumbai