पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळ विस्तारात मुंडे बहिणींना स्थान न दिल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता स्वतः पंकजा मुंडे यांनी या विषयवार मौन सोडले असून नव्याने नियुक्त झालेल्या मंत्र्यांचे अभिनंदन करत त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.