Kolhapur : कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी
Kolhapur : तब्बल आठ ते दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापूर शहरात आज कोविशिल्डचा दुसरा डोस उपलब्ध झाला आहे. शहरातील 11 लसीकरण केंद्रावर उपलब्ध झाल्यामुळे सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच शहरातील सर्व लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले असले तरीही ज्यांना डोस घेऊन जास्त दिवस झाले आहेत त्यांना दुसरा डोस देताना प्रथम प्राधान्य देण्यात आले. तशा पद्धतीची एक यादी सर्व लसीकरण केंद्रावर लावण्यात आली होती. तसेच बहुतांशी लोकांना लस घेण्यासंदर्भात महापालिकेतून संपर्क साधला होता.
बातमीदार - डॅनियल काळे
व्हिडीओ - मोहन मेस्त्री
#Covisheild #Kolhapur