53 मुलीची सोशल मीडियावर फसवणूक करणारा अटकेत
सोशल मीडियाद्वारे तरूणींना भुरळ पाडून ओळख वाढवित त्यांच्या नात्यातील तरूणांना लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तब्बल 57 जणींना गंडा घालणाऱ्या दादल्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चार जणींसोबत घरोबा करून आर्थिंक लुट केल्याचे व तब्बल 53 तरूणींसोबत लग्नाच्या आमिष दाखवून बोलणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आतापर्यंत त्याने 53 लाखांची फसवणूक केली आहे.
#Pune #Police #Crime #SocialMedia #Cybercrime #punepolice