सेल्फी पॉईंट तोडफोड प्रकरणी खडकवासला ग्रामस्थांचे आंदोलन
किरकटवाडी: खडकवासला ग्रामपंचातीच्या माध्यमातून खडकवासला धरण चौपाटीवर उभारण्यात आलेल्या 'आपलं खडकवासला' या सेल्फी पॉईंट ची तोडफोड करणाऱ्या मुख्य सुत्रधारास तातडीने अटक करण्यात यावी या मागणीसाठी खडकवासला ग्रामस्थांनी निषेध आंदोलन केले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे चौकशी करून यातील मुख्य सुत्रधार शोधून काढावा अशी मागणी यावेळी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.
(निलेश बोरुडे)
#Khadakwasla #Kirkatwadi #police #KhadakwaslaSelfiePoint