निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरला प्रस्थान | Nivruttinath Maharaj Palkhi
प्रातिनिधिक स्वरुपात निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान झाले. मोजक्या मानाच्या पालख्यांचे प्रतिनिधी व येथील समाधी मंदिराचे पुजक व माजी विश्वस्त यासह सध्याचे प्रशासक सोनवणे, अँड. गंभीरे, पोलिस निरीक्षक संजय रणदिवे या वेळी उपस्थित होते. रोजची पुजा संपन्न झाल्यावर नारळ देण्यात आला. समाधीची आरती झाल्यावर सजविलेल्या पालखीत श्रींच्या चांदीच्या पादुका व प्रतिमा ठेवल्यावर भजन व किर्तन करीत मंदिर प्रांगणात पालखीचे प्रस्थान झाले. शासकीय कोविडमुळे वारकरी मंदिरात येउ शकले नसले तरी मंदिरा बाहेरील मोकळ्या जागेत त्यांनी कलश दर्शन घेऊन त्यांनी आनंद मानला. महाप्रसाद कार्यक्रम असला तरी बहुतांशी वारकरी यांनी आपल्या सोबत आणलेल्या भाकरी व ठेचा खात समाधान व्यक्त केले.