#Shorts
#DailyYoga
आजचे आसन : अर्ध कटिचक्रासन
अर्ध कटिचक्रासन कसे करावे?
हे आसन करताना शरीराची स्थिती ही अर्ध्या चक्रासारखी होते, म्हणूनच त्याला अर्ध कटिचक्रासन असे म्हणतात. हे आसन करण्यासाठी सर्वांत आधी सरळ सावधान स्थितीत उभे राहा. त्यानंतर उजवा हात सरळ डोक्याच्या वर उचला आणि हळूहळू डावीकडे झुकण्याचा प्रयत्न करा. यावेळी हाताचा कोपरा ताठ आणि हातांची बोटं सरळ ठेवा. गुडघे ताठ ठेवून या स्थितीत नेहमीप्रमाणे श्वासोच्छवास करत थोडा वेळ उभे राहा. यानंतर उजवा हात हळूहळू पूर्वस्थितीत आणत खाली करा.
अर्ध कटिचक्रासनाचे फायदे कोणते?
- पाठीचे स्नायू आणि पाठीचा कणा लवचिक होतो.
- फुफ्फुसातील ब्लॉकेज साफ होतात आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत होते.
- पार्श्वभागाची लवचिकता वाढवते.
- छातीजवळील स्नायूंना योग्य ताण मिळतो.
- मूत्रपिंडाची कार्ये सुधारण्यास मदत होते.
- अतिरिक्त चरबी कमी करून बांधा सुडौल होण्यास मदत मिळते.