Protester Tries Self-Immolation - आंबिल ओढा इथं आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Pune - पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करत असताना स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले आहेत. कारवाईला विरोध करत आंबिल ओढा इथं आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली आहे. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईचा निषेध करताना एकता परिषदेचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. खासगी बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट असल्याचा आरोप किशोर कांबळे यांनी केला आहे.