लोकल बंद असल्याने डबेवाल्यांना वेळेवर डब्बे पोहचवण्यास अडचणी निर्माण होत आहेत. मंत्रालयात डब्बा पोहचवायचा असेल तर लोकलशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच सरकारने या बाबत विचार करून डबेवाल्यांना लोकलने प्रवास करू देण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनतर्फे करण्यात आली आहे.
#mumbai #lockdown #mumbailocal #mumbaichadabbewala