कोविड मृतांना सन्मान देणे प्रत्येकाचे कर्तव्य : अमरनाथ पणजीकर | Corona | Coronavirus | Goa News

Dainikgomantak 2021-06-16

Views 6

पणजी: कोविड महामारीच्या संकटाने आज संपुर्ण जगात हाहाकार केला आहे. शेकडो लोकांचे प्राण जात आहेत. कोविडच्या संसर्गाने मृत झालेल्यांना सन्मान देणे व त्यांच्यावर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास कोणीच आडकाठी आणु नये अशी कळकळीची विनंती गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

काल बस्तोडा येथे घडलेला प्रकार गोव्यात परत घडू नये यासाठी सरकारने त्वरित पाऊले उचलावित अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली असुन, गोमंतकीयांनी कसल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या गांवच्या कोविड बाधीत मृतांवर अंतिम संस्कार करण्यास मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS