करोनाची दुसरी लाट ओसरायला सुरू झालेली असतानाच रस्त्यांवर पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. पहिला पाऊस पडला की मुंबई-पुण्यातील पावलं आपसूकच पावसाळ्यातील पर्यटन स्थळांकडे वळतात. पण, करोनामुळे पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही, याचं भान लोक विसरत असल्याचं दिसत आहे. सुट्टीचा दिवस आणि ई-पास रद्द झाल्याने पुणे आणि मुंबईमधील नागरिकांनी लोणावळ्यात केलेली ही गर्दी...