मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मालवण व वेंगुर्ला येथील नुकसानग्रस्त नागरिकांशी देखील त्यांनी चर्चा केली. कोकण आणि माझे नाते अतूट आहे ते कोणीही तोडू शकत नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यामधून सुमारे 10 कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांच्या समोर स्थानिक मच्छीमार नागरिकांनी आपली व्यथा मांडताना सरकारने आपल्याला भरघोस मदत करावी अशी मागणी केली आहे.
#UddhavThackeray #Konkan #Sindhudurg #cyclonetauktae
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics