केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीकडे निघालेले महाराष्ट्राचे मंत्री बच्चु कडू यांच्या वाहनांचा ताफा बुधवारी (ता.9) उत्तर प्रदेश पोलिसांनी युपीच्या सीमेवर धौलपूर जवळ रोखला. युपी पोलिसांनी आता दडपशाही सुरू केली असून नवी दिल्लीत दाखल होऊ नये म्हणून सर्व मार्ग पोलिसांनीच `चक्का जाम`च्या नावाखाली बंद केल्याचा आरोप कडू यांनी केला.