ठाण्यात मनसेच्या वतीने वाढीव वीज बिलांबाबत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह काही कार्यकर्त्या्ंना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबद्दल मनसे नेते परशुराम उपरकर यांनी राज्य शासनाचा निषेध केला.