राजस्थान, ओडीसा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचारात
आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्याची शक्यता
कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री टोपे यांचा प्रयत्न आहे
त्यादृष्टीने ते मंत्रीमंडळ बैठकीत आरोग्यमंत्री मागणी करणार आहेत
दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते
कोरोनात श्वसनाला त्रास होतो
त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे
आज टास्क फोर्स बरोबर झालेल्या बैठकीत याबाबत झाली चर्चा
दिवाळीनंतर थंडीत येणारी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून राज्य सरकारने या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज यासंदर्भात टास्क फोर्स आणि डेथ ऑडीट कमिटीची बैठक घेतली