महाराष्ट्रात मराठी माणसांवर अन्याय झाला, त्यावेळी शिवसेना उभी राहिली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींचे नांव आहे. पण मोठा पत्रकार म्हणून भाजपने सोडले. मी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने राज्य सरकारने निर्णय घेतला. पोलिसांनी तपास केला. अर्णब किती मोठा आहे, त्याचे कुणाशी संबंध आहे, केंद्रातल्या नेत्यांशी किती जवळीक आहे, याचा विचार न करता अन्वय नाईकला व त्याच्या कुटुंबियांना महाविकास आघाडीने न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.