राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी भाजपाच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदीरासमोर या आंदोलनाची सुरूवात झाली. सकाळपासून या आंदोलनाला सुरवात झाली आहे.
जोपर्यत मंदीर उघडणार नाहीत तोपर्यंत तुळजाभवानीच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे.