सिंधुदुर्गात मंदिरे खुली करण्यासाठी भाजपच्या वतीने आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली. ठाकरे सरकार इशारा देण्याच्या लायकीचे तरी आहेत का, घरातून बाहेर निघणाऱ्या मुख्यमंत्र्यांना इशारा द्यायचा असतो घरात बसणाऱ्या, घर कोंबड्या मुख्यमंत्र्यांना इशारा काय देणार, असा सवाल राणे यांनी विचारला.