ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे किंवा संपणार आहे, अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याने हे घटनाबाह्य असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. प्रशासक नेमायला आमचा विरोध आहे. निवडणूक घेता येत नसतील तर आहे त्या ग्रामपंचायतीलाच सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी ही प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांकडे केली आहे.
#Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #Maharashatra #Viral #ViralNews