कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी बेड मिळत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकानी पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत बेड टाकून निषेध आंदोलन केले. पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासनाकडून हव्या तशा सुविधा निर्माण रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. उपचारात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत बेड टाकून आंदोलन केले. महापालिकेने आतापर्यंत कोरोनासाठी 200 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. मग 200 कोटी रुपये खर्च झाले असताना अजूनही सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर काम करत आहेत. त्यांना रुग्णालयात बेड का उपलब्ध होत नाहीत. पुणे महापालिकेने ज्या रूग्णालयात सोबत करार केला आहे ती रुग्णालय अक्षरशः लॉजिंग अँड बोर्डिंग झाली असल्याचा आरोपही वसंत मोरे यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागं व्हावं आणि महापालिकेसोबत करार असलेल्या खाजगी रुग्णालयात खऱ्या रुग्णाला कसे बेड मिळतील यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.
#Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews