सरपंचांकडे गावचे पालकत्व असते. म्हणूनच गावच्या सुरक्षेची जबाबदारी सरपंचावर असते. आईच्या भूमिकेतून चाकरमानी तरूणांना मी आवाहन केले आहे. गावकऱ्यांना सुरक्षित वाटेल असे वर्तन करावे. रागाची प्रवृत्ती बाळगू नका. प्लीज घरात बसा. गावच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावरही आहे. हे विसरू नका असे आवाहन सरपंच महागाव (ता. गडहिंग्लज)ज्योत्स्ना पताडे यांनी केले. हे आवाहन करताना त्यांना अश्रू अनावर झाले होते