आदिवासी महिलांसोबत आदिवासी नृत्य असलेले फुगडीप्रकारात सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डाॅ. जयश्री थोरात यांनी आदिवासी महिलांना आपलेसे केले. उडदावणे (ता. अकोले) येथे होळीच्या सणात त्या आदिवासींमध्ये रममान झाल्या. या वेळी त्यांनी आदिवासी महिलांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच साडी व लुगड्यांचे वाटप केले. आदिवासी गाण्यांवर त्यांनी ठेका धरल्यानंतर महिलांनी जल्लोष केला