नाशिक : 'इगतपुरी नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या आमदाराने लुडबुड केली. शिवसेना पदाधिका-याच्या घरी बैठक घेऊन राष्ट्रवादीच्या आयात उमेदवाराला उमेदवारी दिली. पैसे घेऊन उमेदवारीचे व्यवहार झाले,' असा जाहीर आरोप भाजपचे प्रदेश पदाधिकारी महेश श्रीश्रीमाळ यांनी थेट तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे केला आहे. त्यामुळे हा आमदार कोण याची चर्चा सुरु झाली आहे.