विनायक दामोदर सावरकर हे वीर सावरकर म्हणून देखील अनेकांना ओळखीचे आहेत. प्रखर हिंदू विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, वकिल, तत्त्वज्ञ विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यसेनानी सोबतच लेखक, भाषाकारही होते. मातृभूमीच्या प्रेमापोटी त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं. ब्रिटिश सत्तेसमोर लाचारी न पत्करता त्यांनी कठोर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. आज 28 मे ही त्यांचा जन्मदिवस.