अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळाने सिंधुदूर्गात धडक दिली आहे. वादळाने मालवण तालुक्याच्या किनारपट्टीवर तडाखा देण्यास सुरुवात केली असून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. रात्री पासून संततधार कोसळणाऱ्या पावसाचा वेग वाढला असून देवबाग येथे माडाची झाडे मोडून पडली असून दोन वीज खांब कोसळले आहेत. तर मालवण देऊलवाडा येथे पोफळीच्या झाडांचे नुकसान झाले आहे. वेंगुर्ले, रत्नागिरी येथे समुद्राला उधाण आलं आहे.
#India #CycloneTauktae #Cyclone #Storm #Rainfall #maharashtra #sindhudurga #Ratnagiri #devgad #devbag