गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. पुन्हा एकदा पुण्यात अग्रितांडव बघायला मिळालं. पुणे-सासवड रोडवरील वडकी गावातील तेल आणि तुपाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.