काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांना सुरक्षा देण्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अदर पूनावाला भारतात नसताना आणि त्यांनी राज्य किंवा केंद्र सरकारकडे तसा कोणता अर्ज केलेला नसतानाही केंद्र सरकार वाय दर्जाची सुरक्षा कसं काय देऊ शकतं? अशी विचारणा नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
#NanaPatole #AdarPoonawalla #SerumInstitute