शिवाजी विद्यापीठाचा 57 वा दीक्षांत समारंभ संपन्न..! | Kolhapur | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 4.5K

नवे शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल होणार आहेत. यामध्ये शिक्षणाचा विचार हा बाल्यावस्थेपासून केला आहे. विविध क्षेत्रातील जागतिक संधींना गवसणी घालणारी, उच्चप्रतिची कौशल्ये आत्मसात केलेली आणि राष्ट्रवादी दृष्टीकोन बाळगणारी पिढी घडवणे हा या नव्या शैक्षणिक धोरणाचा उद्देश आहे. ही पिढी जागतिक स्तरावर या नव्या भारतीय शिक्षण पद्धतीचे प्रतिनिधित्व करेल. असा विश्‍वास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाच्या 57 व्या दीक्षांत समारंभाचे ते प्रमूख पाहुणे होते. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने मागर्दशन केले.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्यांदाच विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पार पडला. सुरुवातीला परीक्षा विभागाचे संचालक जी.आर.पळसे यांनी मिरवणुकीने ज्ञानदंड सभागृहामध्ये आणला. कोव्हीड काळात विद्यापीठाने केले कार्य, नॅक समितीचे मुल्यांकन आणि वर्षाभरातील विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी घेतला. यावेळी प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले,"भारताची अर्थव्यवस्था 5 लक्ष कोटीची होत असताना हे नवे शैक्षणित धोरण योग्यवेळी आणण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्याच्या बाल्यावस्थेतील अध्यापनाचाही विचार केला आहे. खेळ, निसर्गरम्य ठिकाणांना भेटी, कथाकथन या माध्यमातून लहान मुलांना मातृभाषेतून शिकवले जाईल.
बातमीदार - ओंकार धर्माधिकारी
व्हिडीओ - बी. डी. चेचर
#sakalmedia #kolhapur
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS