संदीप गोंडची ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी | Nagpur | National Games |Sakal

Sakal 2021-04-28

Views 377

उमरेड (जि. नागपूर) : आसाम राज्यातील गुवाहाटी येथे सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत उमरेडच्या १५ वर्षीय संदीप गोंड याने १६ वर्षांखालील वयोगटात मुलांच्या ८० मीटर हार्डल्स (अडथळा दौड) स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत रौप्य पदक मिळविले. उमरेड शहरातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात त्याचे कौतुक होत आहे. सर्वसाधारण कुटुंबातील संदीप तीन वर्षांपासून ॲथलेटिक्सचा सराव करीत आहे. काही काळ त्याने नागपूर येथे क्रीडा प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पुण्याला गेला. परंतु, कोरोनामुळे उमरेडला परतला. अंतिम फेरीत तामिळनाडूच्या के हरिहरन पेक्षा १ दशांश सेकंदाने संदीपचे सुवर्णपदक हुकले. मात्र, या अवघड शर्यतीत उमरेड सारख्या ग्रामीण भागात हे पहिलेवहिले पदक मिळाचे बोलले जाते. संदीपच्या कामगिरीने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. (व्हीडिओ : सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS