भटक्या जमातींच्या डोळ्यांतील अश्रू आमच्याही डोळ्यांतून पडतात : विजय वडेट्टीवार | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 956

बहुजन समाजातील लोकांची त्यांच्या मुलांची परिस्थिती फार नाजूक आहे. तरीदेखील काही लोक आमच्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ओबीसीमध्ये भटक्या जमाती, बंजारा, नाथजोगी, वडार अशा अनेक जाती आहेत. यांमधील काही वर्षानुवर्षांपासून पालांमध्ये राहात आहेत. या समाजाच्या वेदना आम्हाला कळतात. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आमच्याही डोळ्यांतून पडतात. महाज्योतीच्या माध्यमातून बहुजन विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर केले जाणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सागितले. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका आणि पीएचडीच्या मागे न लागता जेईईई, नीट, स्पर्धा परीक्षा, युपीएससी, एमपीएससी, पोलिस प्रशिक्षण यांकडे लक्ष केंद्रीत केले पाहीजे. ओबीसी विद्यार्थी कमर्शीअल पायलट झाले पाहिजे, यासाठी आता ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पायलटचे कमर्शीअल प्रशिक्षण देणाऱ्या कंपन्यांसोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या आठवडाभरात हा करार होणार आहे. बहुजनांची मुले पायलट म्हणून तेथे गेली पाहिजेत, असा महाज्योतीचा प्रयत्न आहे. सीए आणि बॅंकांच्या परीक्षांमध्येही बहुजन विद्यार्थ्यांना प्रयत्न करावे, अशी महाज्योतीची इच्छा आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS