कर्मचारी महासंघ कार्यकारिणीला मुदतवाढ ; आक्षेप घेत विरोधकांची निदर्शने | Pune | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 1.6K

पिंपरी, ता. 19 : विद्यमान कार्यकारिणीला तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत शनिवारी घेण्यात आला. तसेच नव्याने विशेष लेखापरीक्षण करून त्यामधील त्रुटींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या विषयांसह विविध विषयास मंजुरी देण्यात आली. मात्र, गणपूर्ती नसतानाही घेतलेली सभा बेकायदेशीर आहे, असा मुद्दा लावून धरत विरोधी गटाच्या सभासदांनी जोरदार निदर्शने केली. त्यांना सभागृहात जाण्यास पोलिसांनी अटकाव केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे होते. काही सभासदांनी प्रत्यक्ष, तर काहींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग नोंदविला. नवीन कार्यकारिणीस मुदतवाढ देणे, संघटनेच्या मागील लेखापरिक्षणातील निर्णयाबाबत विशेष लेखापरीक्षण करणे, महासंघ मासिक वर्गणी दहा रुपये कपात करणे आदी विषय विषयपत्रिकेवर होते. त्याला सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिल्याने सर्व विषय मंजूर झाले.
दरम्यान, अनेक सभासद गेटच्या बाहेर उभे होते, आम्हाला प्रेक्षागृहामध्ये प्रवेश करण्यास बंदी केली, असा आरोप त्यांनी केला. सभास्थळी जाण्यास केलेला अटकाव यासह विविध मागण्यांसाठी विरोधी गटाने निदर्शने केली. आरोग्य कर्मचाऱ्यांचे थंब कधी बंद होणार? मेडिकलचे मालक आता तुम्ही कसे? 2016 नंतरच्या कर्मचाऱ्यांचे काय? प्रोत्साहन भत्ता 300 ऐवजी 150 का केला?, अशा मजकुराचे फलक हातात घेतले होते.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS