गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने झेंडूचा पहिला बहर वाया
पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिखली, किवळे, रावेत, मामुर्डी, पुनावळे, वाकड भागात आजही शेती केली जाते. विशेषतः चऱ्होली परिसरात भाजीपाला आणि फुलशेतीला प्राधान्य दिले जाते. नवरात्री, दसरा, दिवाळी सण म्हणजे फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लक्ष्मी वरदान ठरते. सणांच्या काळात सर्वाधिक मागणी असलेल्या झेंडूची लागवड हे शेतकरी करतात. आता नवरात्र अवघ्या काही दिवसांवर आला आहे. झेंडू काढणीला आला होता. पण, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने पहिला बहर वाया गेला आहे. त्याची वस्तुस्थिती सांगणारे वृत्त थेट फूलशेतीच्या बांधावरून
(व्हिडिओ : पितांबर लोहार)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.