मेट्रोबाधित झोपडपट्टीतील नागरिकांचे काळ्या फिती लावून महामेट्रो कार्यालयासमोर आंदोलन| Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 297

मेट्रोबाधित झोपडपट्टीतील नागरिकांचे काळ्या फिती लावून महामेट्रो कार्यालयासमोर आंदोलन

पुणे : महामेट्रो कार्यालयालवर काळ्या फिती लावून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मेट्रोबाधित झोपडपट्टीतील नागरीकांशी चर्चा न करता कामगार पुतळा झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा परस्पर निर्णय घेत आदेश जारी केल्याप्रकरणी आंदोलन सुरू आहे. रहिवासी आक्रमक झाले आहेत.

1974 साली घोषित झालेल्या झोपडपट्टीतील नागरीकांचे शहराच्या मध्यवर्ती भागातून 14 किलोमीटर बाहेर लोहगाव परिसरात पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यास कामगार पुतळा झोपडपट्टीवासियांचा विरोध असून प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात महामेट्रो, महापालिका प्रशासनाचा निषेध करत रहिवासी घराबाहेर येऊन घोषणाबाजी करत आहेत. निर्णय रद्द झाला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा रहिवाशी देत आहेत
(व्हिडिओ : सागर आव्हाड)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS