स्वतःला जमिनीत गाडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांचे आंदोलन

Sakal 2021-04-28

Views 455

अकोाला: बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या अतिपावसाने 10 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, मका, ज्वारी व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी ही पावसाने खरीप व रब्बी हंगाम पूर्णतः हातून गेला होता. यावर्षीही अतिपावसाने शेतकरी उध्वस्त झाला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना एक रुपयांची ही मदत मिळाली नाही. पंचनामे झाले नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. शेतकऱ्यांना सरकारकडून हेक्टर 25 हजार रुपये मदत मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील परडा शिवारात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात आंदोलनाला सुरुवात केली आहे. ते स्वतः ला गाडून घेऊन आंदोलन चालू केले आहे.

Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS