कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक श्राद्ध आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणांनी परिसर मात्र दणाणून गेला.
बातमीदार : संदीप खांडेकर
व्हिडिओ : मोहन मेस्त्री