उमरेड (जि. नागपूर) : पाच-सहा महिन्यांपासून देश विदेशासोबतच राज्यात कोरोना महामारीचा फैलाव झपाट्याने वाढत असताना राज्य सरकारने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंद करण्याचे आदेश दिले होते. सोबतच श्रावणातील सण, गणेशोत्सव सर्वच घरच्या घरी साजरे करण्याचे आदेश जारी केले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिला. परंतु, पाच महिन्यांचा काळ लोटूनसुद्धा महाआघाडी सरकारने मंदिरे उघडी करण्याची मुभा दिली नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात आले. उमरेड विधानसभा क्षेत्रातील विविध मंदिरांच्या द्वारात माजी आमदार सुधीर पारवे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह दार उघड उद्धवा असे म्हणत घंटानाद आंदोलन करण्यात आले. (व्हिडिओ - सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.