सोशल मीडियावर कालपासून घरकाम करणाऱ्या एका काकूंचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. त्यावर मिम्सचा अक्षरश: पाऊस पडतोय. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर व व्हॉट्सअपवर या व्हिडिओनं धुमाकूळ घातलाय. एकीकडं या गोष्टीची खिल्ली उडवतायेत, तर दुसरीकडं सहानुभूती दाखवली जातेय. नक्की काय आहे हा व्हिडिओ, जाणून घेऊयात.
व्हिडिओमध्ये मुलगा आणि काकू, असे दोन जण दिसतायेत. तर हा सगळा प्रकार रुमवरच्याच एका मुलाने रेकॉर्ड केलाय. त्याच्या शेजारी अजून एकाचा आवाज ऐकू येतोय. या व्हिडिओमध्ये तरुण त्या काकूंना सांगतोय, की आज सकाळीच तुम्हाला अठराशे रुपये दिले. त्यामुळं तुम्ही एक्स्ट्रा पैसे कशाचे मागतायेत? त्यावर काकू म्हणतायेत, की तुम्ही पाचशेच्या तीन आणि तीनशे रुपये दिले. हे दीडच हजार झाले. ते अठराशे रुपये थोडीच होतात. मला माझे अठराशे रुपये द्या. मी उद्यापासून कामाला येणार नाही, असा तो वाद व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
#Sakal #SakalMedia #Viral #ViralVideo
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.