फुलांचा बाजार कोमेजला; शेतकरीही अडचणीत | Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 162

नागपूर : श्रावण महिन्यात सण-उत्सवांचा श्रीगणेशा होतो. व्रतवैकल्य केले जात असल्याने फुलांच्या मागणीत विक्रमी वाढ होते. यंदा कोरोनामुळे शहरातील सर्वच प्रमुख मंदिरं कुलूपबंद आहेत. श्रावण महिन्यातील सण, सार्वजनिक उत्सवावरही सरकारने बंदी घातली आहे. त्याचा फटका शहरातील फुलविक्रीला बसल्याने फुलांचा बाजार कोमेजला आहे. फुलांना मागणी नसल्याने नेताजी मार्केटमधील विक्रेते आणि शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. येथील नेताजी मार्केटमध्ये दररोज सकाळी फुलबाजार भरतो. राज्यासह इतर राज्यातील फुलांची मोठ्या प्रमाणत आवक होत असल्याने दररोज १५ ते २० लाखांच्या फुलांची विक्री होते. कोरोनामुळे फुलबाजारावर परिणाम झाला आहे.
(व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS