पंचमुखी स्वयंभू पाताळेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात वाढली पाण्याची पातळी | मराठी ताज्या बातम्या |

Sakal 2021-04-28

Views 284

उमरेड : सध्या श्रावण महिना सुरू झालेला आहे. हिंदू धर्मात या महिन्याला वैदिक काळापासून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जाते. महादेवाचे प्राचीन, रहस्यमयी शिवमंदिर उमरेड शहरातील मंगळवारी पेठेत अनेक वर्षांपासून इतिहासाची साक्ष देत उभे आहे. मंदिराचे वैशिष्ट्य असे की मंदिराचा गाभारा हा जमिनीपासून साधारणतः १० फूट खोल आहे. त्याठिकाणी पंचमुखी शिवलिंग विराजित आहे. महत्वाचे म्हणजे श्रावणात या मंदिराच्या गाभाऱ्यात पाण्याची पातळी वाढत जाते आणि शिवलिंग पाण्याखाली जाते. (व्हिडिओ - सतीश तुळसकर)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS