जंगली मशरूम विक्रीला उधाण | Latest Marathi News I Marathi News | ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 133

नागपूर जिल्ह्यातील वेलतूर व परिसरात जंगली मशरूम विक्रीला उधाण आले आहे. या विक्रीतून अनेकांना हंगामी व्यवसाय मिळतो. जंगलात नैसर्गिकरित्या उगवणारी ही वनस्पती जीवनसत्वांनी परिपूर्ण असल्याने तिला सर्वत्र मागणी असते. कोरोना लॉकडाऊनमध्ये स्थानिक ग्राहकांवरच मशरुम विक्रेत्यांना समाधान मानावे लागत आहे. जंगलातील झाडाझुडपात ही वनस्पती पावसाळ्यात उगवत असते. महाराष्ट्रात सुमारे 150 प्रकारच्या मशरूमचे प्रकार आढळून येतात. त्यापैकी काही विषारी असतात. आकार, रंग आणि उगवण्याच्या जागेवरुन खाण्यायोग्य मशरूमची निवड केली जाते. ही वनस्पती चवीला उत्कृष्ट असून मधूमेह, कॅन्सर अशा आजारांवर औषधी म्हणूनही उपयोगी आहे. अळींबी, भुछत्री, कवकी, डोंगरछाती अशा अनेक नावांनी ही वनस्पती ओळखली जाते. सध्या वेलतूर परिसरातील जगंलात त्या मोठ्या प्रमाणात मिळत आहेत हे विशेष. (व्हिडीओ- शरद शहारे)


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS