इतिहास संशोधकाने शोधले शिवछत्रपतींच्या सरदाराचे स्मारक | Pune | Shivaji Maharaj | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 309

मरहट्टी इतिहास संशोधक मंडळाच्या सदस्यांनी बारामती येथील कन्हेरी गावात शोधून काढले शिवछत्रपतींच्या सरदाराचे स्मारक. शिवछत्रपतींच्या स्वराज्य कार्यात महाराष्ट्रातील अनेक घराणी सामील झाली होती यातीलच एक अग्रगण्य नाव म्हणजे देवकाते. सरदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांची ही समाधी संतोष पिंगळे व सुमित लोखंडे या इतिहास अभ्यासक मित्रांनी बारामती तालुक्याच्या कण्हेरी गावात नुकतीच शोधून काढलेली आहे.
याबाबत माहिती देताना पिंगळे म्हणाले,"स्वराज्यावर आढलेल्या संकटाच्याकाळी असंख्य सरदारांनी साहसी कार्य करून स्वराज्याचे रक्षण केले. तर या सर्व सरदारांना वतने, इनामे व सरंजाम देऊन गौरविण्यात आले होते. त्यात सुभानजी देवकाते यांचाही समावेश होता. त्यांना बारामती तालुक्यातील कन्हेरी, सोनगावसह अनेक गावे इनाम स्वरूपात देण्यात आले होते. स्वराज्याच्या अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये देवकाते यांनी आपले योगदान दिले होते. काही ऐतिहासिक कागदपत्रांच्या माहितीनुसार सुभानजी यांचा मृत्यू नोव्हेंबर 1707 मध्ये झाला. तर कन्हेरी गाव त्यांच्या वतनी पाटीलकीचा व सरदारी इनामाचा गाव असल्याने येथे त्यांचे स्मारक तयार करण्यात आले. अभ्यासादरम्यान समाधीच्या दर्शनी भागात सूर्य, चंद्र व गणपतीच्या प्रतिमा तर इतर बाजूस कमलचिन्हे कोरलेली आढळून आली. तसेच एक शिलालेखही सापडला असून पहिल्या ओळीतील अक्षरे स्पष्ट आहेत तर पुढील ओळी व अक्षरे नष्ट झाली आहेत. मात्र समाधीच्या इतिहासाबद्दल माहिती नसल्याने गावकऱ्यांनी त्याचे महादेवाच्या मंदिरात रूपांतरण केले आहे." दरम्यान याबाबतची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या हेतूने लवकरच या समाधीवरील पुस्तक काढण्यात येणार आहे. असे पिंगळे यांनी नमूद केले.
#Sakal #ShivajiMaharaj #Smarak #Pune

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS