कोल्हापूर : एका खोलीत मोबाईलवर इंटरनेट सुरू करायचे. ठराविक अंतरावर उभे राहून धडे देण्यास सुरवात करायची. विद्यार्थ्यांना कळेल, अशा भाषेत शिकवत राहायचे. जणू शिक्षण चार भिंतीत विद्यार्थ्यांसमोरच सुरू आहे, असा हा ऑनलाईन धडे देण्याचा उपक्रम. एक जूनपासून सूरू झाला आहे. विद्यार्थी घरबसल्या ज्ञानार्जनात व्यस्त झाले आहेत. कोरोनाचा कहर अन बंद शाळा, विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे? या प्रश्नाला प्रायव्हेट हायस्कूलमधील शिक्षकांनी समर्पक उत्तर दिले आहे.
व्हिडिओ - बी. डी. चेचर