नाशिक : मुंबई, ठाणे, नाशिक च्या ग्राहकांना पोच भाजीपाला देण्यात येत आहे. मधली व्यवस्था टाळण्यासाठी अनेक शेतकरी एकत्र येतात आणि सोसायटी मधील मागणीनुसार भाजीपाला वजन करून बॉक्समध्ये पॅक केला जातो. शेतकऱ्यांची वाहने सोसायटी मध्ये जाऊन मागणीनुसार भाजीपाला पोच करतात. दिवसाला 250 टनाहून अधिक भाजीपाला शहरी ग्राहकांना शेतकरी थेट पोचवतात.