कवितांच्या संग्रहाचा बनला तो युगंधर; व्हिडीओ कवितांना रसिकांकडून मिळतेय दाद
अकोला : लाॅकडाउनमुळे परीक्षा रद्द करण्यात आल्याने आता चिमुकल्यांना नो टेन्शन. मात्र सुट्ट्यांचा हा काळ मोठा, त्यात लाॅकडाउनमुळे बाहेर पडता येत नाही. अशातच घरात बसून काय करावे हा यक्षप्रश्न सर्वांना पडला आहे. यात चवथ्या वर्गात शिकणाऱ्या युगंधर पाकदुने याने प्रसिद्ध कवींच्या कविता व्हिडीओ रेकाॅर्ड करून संग्रहित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या स्वरातून साकारलेल्या या व्हिडीओंना सोशल मीडियावर चांगली दाद मिळत आहे.