नागपूर : कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून संपूर्ण देशात लाॅकडाऊन आहे. लाॅकडाऊनमुळे सध्या नेते मंडळींचाही घरीच मुक्काम आहे. याच वेळात काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी काही वेळ आपल्या किचनमध्ये घालवला आणि विदर्भातील प्रसिद्ध बेसन आणि खिचडी तयार केली. भाजी खरेदीसाठी न जाता, बेसना सारखे पदार्थ तयार करुन, लोकांनी भाजीपाल्याला पर्याय द्यावा आणि बाहेरील गर्दी टाळावी... हाच संदेश यातून आशिष देशमुख यांनी देण्याचा प्रयत्न केला.
#AshishDeshmukh #Cooking #Curfew #Nagpur #Vidarbha #SakalNews #MarathiNews