महिलांच्या सन्मानासाठी
पुरूष उतरले रस्त्यावर
---
लातूर : महिलांवर अॅसिड टाकणे, पेट्रोल टाकून जाळणे, त्यांच्यावर अत्याचार करणे... असे प्रकार गेल्या काही महिन्यांत वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर, महिला दिनाचे औचित्य साधून महिलांकडे माणूस म्हणून पहायला शिकले पाहीजे, हा संदेश देण्यासाठी लातूरात रविवारी सकाळी पुरुषांचा मूक मोर्चा निघाला. हजारो पुरुष यात सहभागी झाले होते. महिलांचा सन्मान व्हावा म्हणून या अनोख्या रॅलीसाठी लातूरातील भारतीय स्त्री शक्ती संघटनेने पुढाकार घेतला होता.
(व्हीडीओ : सुशांत सांगवे)