यंदाचा महाराष्ट्र दिवस न्यू यॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर साजरा करण्यात आला. मराठी आणि गुजराती बांधवांनी एकत्र येऊन हा दिवस साजरा केला. या दिवशी दोन्ही राज्यातील बांधव एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचं, भाषेचं कौतुक सगळ्या जगाला दाखवू पाहत होते. दांडियाचा नृत्य अविष्कार आणि ढोल ताशाच्या गजराने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.